बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारीच की! बीएम डब्लूची इलेक्ट्राॅनिक कार लवकरच लाँच, एकदाच करा चार्ज अन्….

नवी दिल्ली | भारतात बीएमडब्लूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच या करला अनेक लोकांकडून प्रचंड पसंतीसुद्धा आहे. काही दिवसांपुर्वी बीएमडब्लूने भारतात एम 340 आय एक्स ड्रायव्ह सेडान बाजारात आणली होती. मात्र आता बीएमडब्लूने ऑल इलेक्ट्राॅनिक आय 4 इलेक्ट्राॅनिक स्पोर्ट सेडानचं उद्घाटन केलं आहे.

बीएमडब्लूने दिलेल्या माहितीनुसार आय ईड्रायव्ह 35, ईड्रायव्ह 40 आणि रेंज टाॅपिंग एम 50 एक्सड्रायव्ह अशा तीन व्हर्जन्समध्ये लाँच होणार आहे. ही कार 580 किमी श्रेणीसह आहे. या कारला एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 590 किमी प्रवास करु शकता. ही कार 1 सेकंदमध्ये 0 ते 100 वेगावे धावू शकते.

इतर देशांमध्ये बीएमडब्लू आय 4 चा सामना टेस्ला माॅडेल 3 च्या मुकाबले होणार आहे.  आय ईड्रायव्ह 8 टेकनाॅलजीचा वापर करणाऱ्या जर्मन कार निर्मात्याने बीएमडब्लू आय 4 ही पहिली स्पोर्ट्स कार बनवली आहे. यामध्ये 14.9 इंचचा टचस्क्रीन डिसप्ले असेल. तसेच 12.3 इंचचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नवीन आय 4 केबिन दिले जातील.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी भारतात लाँच झालेली बीएमडब्लू एम 340 आय एक्स ड्रायव्हने अवघ्या एका दिवसात सर्व युनिट्स विक्रीवर नेले होते. त्यानंतर आता या कारच्या बुकिंग्स बंद करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!

अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला ‘तो’ शब्द पाळला!

उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांच्या ‘या’ व्हिडीओमुळे वारकरी संतप्त, पाहा व्हिडीओ

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

“सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More