मुंबई | बंगाली टीव्ही मालिका मोन माने ना मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पल्लवी डे कोलकाता येथील गरफा येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पल्लीवाने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
पल्लवी डे तिच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून पल्लवी डे यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. सध्या पल्लवी डे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात पल्लवीचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. या घटनेने बंगाली मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. पल्लवीची सहकलाकार अनामित बतबायल म्हणाली की मला खूप आश्चर्य वाटत आहे. आम्ही 12 मे रोजी टीव्ही मालिकेसाठी शूटिंग केलं आणि नंतर बोललोही. मला अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाही.
थोडक्यात बातम्या
‘वज़नदारने हल्के को…’; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता…
नोकरीऐवजी तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रूपये
“माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात”
Comments are closed.