बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

मुंबई | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर त्याचे परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये महिंद्राची बोलेरो गाडी पाण्यात वाहताना दिसत आहे. यावर महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे.

गुजरात राज्यातील जामनगर आणि राजकोटमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये गुजरातमधील या शहरातील पुराच्या पाण्यातून एक कार चालक महिंद्रा गाडी चालवत आहे. पाण्याचा वेगही जोरात असल्याचं दिसून येत आहे. तरी तो चालक त्या पाण्यातून सहज गाडी चालवताना दिसत आहे.

तो व्हिडीओ एका नेटकऱ्याने ट्विटवर अपलोड केला होता. त्यामध्ये त्याने त्या राजकोटचे पोलीस, राजकोटचे जिल्ह्याधिकारी आणि महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग केलं आहे. यानंतर आनंद महिंद्रा यांनी ते ट्विट रिट्विट करत आपली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘महिंद्रा है तो मुमकिन है’ या  कॅप्शनसह तो व्हिडीओ नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. खरचं एवढ्या पावसाचं दृश्य पाहुण मी स्वत: हैराण झालो आहे, असं आनंद महिंद्रा म्हणाले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

पिल्लाचा मृतदेह सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More