मुंबई। अमरनाथ यात्रेला 30 जून पासून सुरवात झाली. या यात्रेमध्ये देशातले अनेक भाविक उपस्थित आहे. मात्र या भविकांवर संकट कोसळलं आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली असून तिथे एनडीआरएफ(NDRF), एसडीआरएफ(SDRF) कडून बचाव कार्य सुरु आहे.
अमरनाथ गुहेजवळ ही ढगफुटी सायंकाळी सहा वाजता झाली. गुहेच्या वरच्या बाजूस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे तिथल्या पाण्याचा प्रवाह खाली आला. झालेल्या ढगफुटीमुळे अनेकांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपता असल्याची माहिती समोर आली आहे.
अमरनाथ गुहेजवळ झालेल्या या घटनेवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(Actor Akshay Kumar) यांनी ट्विट करत या ठिकाणी अडकलेल्या काही भाविकांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे. पुढे तो असं देखील म्हणाला की, ‘बालटालमध्ये अमरनाथ मंदिरातील पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर झालेल्या जिवितहानीमुळे खूप दुःख झालं. सर्वांच्या शांती आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना’.
दरवर्षी IMD हवामानाबाबत अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सूचना जारी करते. शुक्रवारी देखील IMD ने तिथल्या नागरिकांसाठी यलो अलर्ट दिला होता. यात्रेच्या वेबसाइटवर संध्याकाळी 4.07 पर्यंत हवामान अंदाजानुसार, पहलगाम आणि बालटाल या दोन्ही बाजूच्या मार्गांसाठी “अंशत: ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा” अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अचानक झालेल्या ढगफुटीने लोक हादरून गेले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“धनुष्यबाण आमचा प्राण आहे, आधी प्राण जाईल मग धनुष्यबाण”
उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण….- बच्चू कडू
…अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विठ्ठलाची महापूजा करता येणार नाही!
Elon Musk यांनी ट्विटरसोबतचा करार केला रद्द; धक्कादायक कारण समोर
“106 हुतात्म्यांनी मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही, 106 जण ती जावी म्हणून दिवस-रात्र झटतायत”
Comments are closed.