बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आर्यनला श्वास घेण्याची संधी द्या कारण…’; ड्रग्ज प्रकरणाबाबत सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य!

मुंबई | ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धडक कारवाई केली होती. यावेळी आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी एनसीबीनं छापा मारला आहे, त्या ठिकाणी आणखी काही लोक होते. आपण फक्त अंदाज बांधतो की या मुलानं ड्रग्ज घेतलं आहे, त्या मुलानं घेतलं आहे, असं शेट्टीने म्हटलं आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. आता आर्यन खान आणि इतर ताब्यात घेतलेल्या मुलांना श्वास घेण्याची संधी द्या. जेव्हा पण आमच्या चित्रपट क्षेत्रात काही घडतं, त्यावेळेस मीडिया तूटून पडते. प्रत्येकास वाटतं की, हे असंच असेल. आता मुलाला रिपोर्ट करण्याची संधी द्या, ज्यामुळे सत्य सर्वांसमोर येईल. जोपर्यंत तो लहान आहे, तोपर्यंत काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे, असं शेट्टी म्हणाला.

दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या चौकशी दरम्यान आर्यन खानचा मोबाईल जप्त केला आहे. मोबाईल मध्ये काही या प्रकरणाचे चॅटस मिळाले आहेत. तसेच आर्यननं ड्रग्ज घेतल्याची कबूलीही एनसीबीला दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

ह्रदयद्रावक! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यू

राष्ट्रवादीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ

‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

शाहरूख खानचा मुलगा असू नाहीतर इतर कोणाचाही त्याला…- रामदास आठवले

‘मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत…’; नवज्योत सिंग सिद्धूंचं मोठं वक्तव्य!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More