मुंबई | लग्नाआधीच गरोदर असलेली बाॅलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कल्कीची प्रेग्नेंसी काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत होता. मात्र आई झाल्यानंतर आता चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच मागील 2 वर्षापासून कल्की गाय हर्शबर्गसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
कल्की अनेक दिवसांपासून तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तसंच तिने आपल्या बेबी बंपसोबत स्टायलिश फोटोशूटही केलं होतं. त्यामुळे तिला खूप लोकांनी ट्रोल केलं. मात्र, मी गरोदर आहे म्हणून लग्न करणार नाही, असं मत कल्कीनं मांडलं होतं.
गाय हर्षबर्गनं आपल्या बाळाचं एक असं नाव ठरवलं आहे की जे मुलगा किंवा मुलगी दोघांवरही सूट होईल. कल्की आणि गाय हर्शबर्गनं अजून लग्न केलं नाही. मात्र, आता लग्न करण्याचा विचार चालू आहे.
कल्कीनं सांगितल्याप्रमाणं वॉटर बर्थच्या माध्यमातून तिनं मुलीला जन्म दिला. कल्कीच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेनं वाट पाहत आहे.
ट्रेंडिंग बातम्या –
सरकारी नौकरी किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळणे मूलभूत हक्क नाही- सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्राला अशांत करु नका, अन्यथा..; नवाब मलिकांचा राज ठाकरेंना इशारा
तलवारी फार जुन्या झाल्या, आता नवी शस्त्रं आली; भुजबळांचा राज ठाकरेंना चिमटा
महत्वाच्या बातम्या –
माझ्या मुलीला जितका त्रास झाला तितका आरोपीला व्हायला पाहिजे; पीडितेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू; 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी
सरकारी नौकरी किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळणे मूलभूत हक्क नाही- सर्वोच्च न्यायालय
Comments are closed.