पुणे | कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यासह देशभरात पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्सेस युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. पोलीस प्रशासनही मोठ्या हिमतीने कोरोनाविरूद्धच्या लढाईत लढत आहेत. मात्र या योद्ध्यांवरच समाजातील काही समाजकंटक त्यांना मारहण करत असल्याचे प्रकार घडत आहेत. यावर अभिनेता हेमंत ढोमेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!, अशी संतप्त प्रतिक्रिया ढोमेने दिली आहे. पिंपरीतील काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण करण्यात आली. या व्हिडोओवर त्याने आपला क्रोश व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांने ट्विट केलं आहे.
पिंपरीतील काळेवाडी परिसरात गर्दी झाल्याची माहिती समजल्याने तेथे जाऊन फळविक्रेत्याला आणि लोकांना पांगवणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
दरम्यान, हेमंत ढोमेचे वडील हे स्वतः पोलीस अधिकाही होते. काही महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले आहेत.
बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत! https://t.co/zjPNX0gYGY
— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) April 27, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे
अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोप्प नाही; शिवसेनेच्या टीकेला भाजप आमदाराकडून प्रत्युत्तर
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश
आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा
राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Comments are closed.