Top News महाराष्ट्र मुंबई

“स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं”

मुंबई | ड्रग्ज प्रकरणावरून बॉलिवूड इंडस्ट्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणाऱ्या कलाकारांना खासदार जय बच्चन यांनी राज्यसभेत चांगलेच खडेबोल सुनावले होते. जया बच्चन यांच्या परखड वक्तव्याला शिवसेनेच्या अग्रलेखातून पाठींबा देण्यात आला आहे.

भारतीय सिनेसृष्टी ही पवित्र गंगेप्रमाणे नाही मात्र काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्यामुळे चित्रपटसृष्टीला गटार म्हणता येणार नाही. स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं, असा प्रकार सध्या सुरू असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

जया बच्चन यांनी संसदेत मांडलेली भूमिका ही परखड आणि महत्वाची आहे. चित्रपटसृष्टीची बदनामी सुरू असताना भलेभले पांडव तोंडात गुळणी धरून बसलेले आहेत. पडद्यावर शुरूवीर लढवय्यांच्या भूमिका साकरात वाहवाह मिळवणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि तोंडाने कुलुपबंद होऊन बंद पडले आहेत. दाखवायचे दात वेगळे आणि खायच दात वेगळे असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

दरम्यान, चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ हे ड्रग्जच्या जाळ्यात अडकलेले आहेत. 24 तास गांजा आणि चिलीमीच्या झुरक्या मारत तो दिवस ढकलतात, असं वक्तव्य करणाऱ्यांची डोपिंग चाचणी करायला हवी, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जनतेच्या पैशातून कंगणाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

पुण्याजवळील ‘या’ भागात होणार उद्यापासून लॉकडाऊन

“आज बाळासाहेब असते तर ही घटना घडलीच नसती”

उदयनराजेंनी पहिल्यांदाच मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत दिला हा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या