मुंबई | भाजपने महाराष्ट्र सरकारकडे औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने भाजपवर निशाणा साधला आहे.
पाच वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा तर नाव बदललं नाही. सत्तेतून बाहेर येताच सर्कस सुरु झाली आहे. काय साहेब…लोक मूर्ख वाटले का?, असं विशाल दादलानीने म्हटलं आहे. यासंदर्भात त्यानं ट्विट केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, लोकांकडे रोजगार नाही, सारे उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. देशात जीडीपी असा कमी होत आहे जसा भाजपचा नैतिक स्तर, आणि सियाचिनमध्ये देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. ‘ECONOMY त्रस्त, मोदी मस्त’, अशीही टीका याआधी विशाल दादलानीने केली होती.
5 years in power, but no name change.
A few months out of power, and the circus begins.
काय, साहेब? लोक मूर्ख वाटते का? https://t.co/oo80B0rL5O
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) March 2, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“गळ्याची आण खरं सांगतो; …तर मुनगंटीवारांना सगळ्यात जास्त आनंद होईल”
भाजपच्या नगराध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक
महत्वाच्या बातम्या-
…अन् विराट कोहलीचा ‘तो” डाव पंचांनी ओळखला!
अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार नाही; टाकलं मोदींच्या पावलावर पाऊल!
“गळ्याची आण खरं सांगतो; …तर मुनगंटीवारांना सगळ्यात जास्त आनंद होईल”
Comments are closed.