बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!
वाॅशिंग्टन | अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका महिलेला कोर्टाने 40 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने तिच्या लहान बहिणीसोबत आणि वडिलांसोबत मिळून थॉमस नावाच्या व्यक्तीची हत्या केली. थॉमस आरोपी महिलेच्या लहान बहिणीचा बाॅयफ्रेंन्ड होता. तिघांनी त्याला 3 दिवस टॉर्चर केलं नंतर त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.
डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बॉयफ्रेन्ड थॉमसला मारण्याआधी तिघांनी त्याला ड्रग्स दिलं आणि नंतर मारहाण केली. त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरला गेला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अमांडा आणि तिचे वडील लॅरीला यांनी थॉमसला जीवे मारल्याच्या तीन आठवड्यानंतर वर्जीनियामध्ये लग्न केलं.
तपासातून समोर आले की, अमांडा आणि तिचा बॉयफ्रेन्ड बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही इंडियाना स्टेटमध्ये राहत होते. एक दिवस त्यांची गाडी बिघडली. ज्यानंतर अमांडाचे वडील लॅरी आणि तिची बहीण अन्ना इंडियाना येथे आले आणि दोघांना वर्जीनियाला घेऊन गेले. लॅरीला म्हणजे अमांडाच्या वडिलांना अमांडासोबत लग्न करायचं होतं. पण त्यात बॉयफ्रेन्ड आडकाठी ठरत असल्याने त्याची हत्या केल्याचं कारण समोर आलं आहे.
दरम्यान, चौकशी दरम्यान अन्नाने सांगितले की, लॅरीने थॉमससोबत ट्रस्ट गेम खेळण्यास सांगितले आणि नंतर आम्ही थॉमसचे पाय बांधले. त्यानंतर आम्ही त्याला ड्रग्स दिलं. नंतर त्याला मारलं. जेव्हा तो सुटकेसाठी धडपड करत होता तेव्हा अमांडाने त्याच्या डोक्यात वाइनची बॉटल मारली. नंतर आम्ही त्याचा मृतदेह एका काळ्या बॅगेत भरून जमिनीत पुरुन टाकला.
थोडक्यात बातम्या –
स्वत:च्या लग्नाची पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू!
मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं
“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”
रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल
पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.