रशियाकडून युक्रेन विमानतळावर बॉम्बफेक, लाईव्ह व्हिडीओ आला समोर
कीव | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिले. युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाने नवी खेळी केली आहे. रशियाने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाने जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या निर्णयाने रशिया-युक्रेन वादाला तोंड फुटलं. त्यानंतर रशियाकडून युक्रेनच्या लष्करी आणि हवाई विमानतळांना लक्ष्य करण्यात येत आहे. रशियाकडून युक्रेन विमानतळांवर बॉम्बफेक करण्यात आली असून विमानतळ धुमसतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
युक्रेनची राजधानी असलेल्या कीवसह बोरीस्पिल, निकोलायव्ह, खेरसन व अनेक विमानतळांवर रशियाने हल्ला केला आहे. तर खार्किव लष्करी विमानतळ जळतानाचा व्हि़डीओ समोर आला आहे. इतकंच नाही तर युक्रेननेदेखील लुहान्स्कमधील युक्रेनच्या हद्दीत 5 लष्करी रशियन विमानं आणि 11 हेलिकॉप्टर खाली घेतल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यानंतर कीव विमानतळ रिकामं करण्यात आलं आहे. गुरूवारी सकाळपासूनच युक्रेनच्या अनेक भागात स्फोट होत असल्याची माहिती समोर येत आहे.
! Ukraine’s central military command reports Russia bombed several airports, including Kyiv Boryspil, Nikolaev, Kramatorsk, Kherson. Kharkiv military airport is burning. pic.twitter.com/IOrfGZgPL4
— Christo Grozev (@christogrozev) February 24, 2022
थोडक्यात बातम्या-
Gold Rate: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर, वाचा आजचे ताजे दर
“नवाब मलिकांनी बांग्लादेशातून मुली मुंबईत आणून वेश्याव्यवसाय केला…”
Apple ची बंपर ऑफर; iPhone 13 वर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, होतील ‘हे’ गंभीर परिणाम
मोठी बातमी! पुतीनची युक्रेनवर सैन्य कारवाईची घोषणा
Comments are closed.