नवी दिल्ली | बीएमडब्लू घेऊ ईच्छित असणाऱ्या लोकांसाठी त्यांची ड्रीम कार बुक करण्याची एक सुवर्ण संधी आहे. भारतात लाँच झालेल्या ऑल-न्यू बीएमडब्लू एम340आय या सेडान कारची एक्स शोरुम किंमत 62.90 लाख रुपये इतकी आहे. या कार काही मर्यादा पर्यांतच बाजारात विकल्या जाणार असून ग्राहक 1 लाख रुपये देऊन या लक्झरी कारची बुकिंग करू शकतात.
कार बुक करणाऱ्या पहिल्या 40 ग्राहकांना भारतातील लोकप्रिय रेसट्रॅकमध्ये क्यूरेट ड्रायव्हर ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्याचं प्रमाणपत्रदेखील दिलं जाईल. BMW M340i एक ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअपसह येणारी सर्वात वेगवान कार आहे.
ही कार 3.0 लीटर, 6 सिलेंडर इंजिनासह सादर करण्यात आली आहे. या कारचे इंजिन 387 बीएचपी पॉवर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार अवघ्या 4.4 सेकंदात 100 किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक गती धारण करण्यास सक्षम आहे. या कारच्या इंजिनला पॅडल शिफ्टर्ससह 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा आहे. बीएमडब्ल्यू M340i ला इलेक्ट्रिकली मॅनेज करण्यासाठी नवीन लिफ्ट-रिलेटेड डम्पर कंट्रोल देण्यात आला आहे.
दरम्यान, या कारमध्ये 18 इंचांची चाके आहेत जी 19 इंचाच्या पर्यायासह अपग्रेड केली जाऊ शकतात. यात ड्युअल आउटलेटसह डिटेल्ड एलईडी टेललाईट्स आणि एम स्पोर्ट एक्झिटचा एक सेट देखील आहे.
थोडक्यात बातम्या-
‘ये तो सोची समझी चाल’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची भाजपवर टीका
कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा?- चित्रा वाघ
‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ
धक्कादायक! नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद टोकाला, तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या
काँग्रेस काय पाकिस्तानमधून आलेली आहे का?- संजय राऊत
Comments are closed.