पुणे महाराष्ट्र

पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला!

पुणे | मुळशी तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली. त्यावेळी त्यात बर्ड फ्लू विषाणू नसल्याचा अहवाल आला होता. मात्र तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला. यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूच्या विषाणूने झाल्याचं निष्पन्न झालं.

शासनाने नांदे परिसरातील सर्व नागरिकांना आणि ग्रामस्थांना कोंबड्यांची विल्हेवाट करण्याच्या सूचना दिल्या.

पोल्ट्री फार्मवर कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना एका चिमुरड्याला अश्रू अनावर झाले. कोंबड्या नेत असताना हा मुलगा ढसाढसा रडू लागल्याचं यावेळी पहायला मिळालं. ‘नाही नाही….’ असं म्हणत हा चिमुरडा कोंबड्यांसाठी रडत होता. कारण घरातील पाळीव प्राण्यांशी लहान मुलांचे एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं.

थोडक्यात बातम्या-

“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”

आरोग्य विभागात ‘इतक्या’ हजार पदांची भरती होणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे ‘या’ दिवशी दिसणार एकाच मंचावर!

‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या