बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं, प्रेयसीबद्दल लिहिल्या धक्कादायक गोष्टी

औरंगाबाद | औरंगाबादेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकरानं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. पैठणमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. कृष्णा खुटेकर असं आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी केबल वायरच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.

चिठ्ठी लिहून कृष्णा खुटेकर याने आत्महत्या केली आहे. पोलिस तपासात मृतदेहाच्या खिशात ही चिठ्ठी सापडली आहे. ती मला खूप त्रास देत आहे. मला काही काही धमक्या देत आहे. मी खून मानसिक तणावातून जात हे पाऊल उचलत आहे. तरी, माझी काही चूक नाही, असं लिहिलं आहे.

दरम्यान, संबंधित मुलगी मानसिक त्रास देत आर्थिक लुबाडणूक करत असल्याचाही आरोप संबंधित तरुणीवर करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला”

अन् भर संसदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या…’निर्मलाताई, माझ्या दादाकडून अर्थखातं शिका’

आता जनताच या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार

राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या वादात आठवलेंची उडी, म्हणाले…

पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!s

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More