बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींनी 4-5 वर्ष घेतलेल्या कष्टामुळे नीरज चोप्रासारखी मुलं ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकत आहेत”

नवी दिल्ली | यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 7 पदके आलीत. यामध्ये एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकाचा समावेश आहे.  ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेेळाडूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला त्यावेळी मोदींनी सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं कौतुक केलं. मात्र अशातच केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांनी अजब वक्तव्य केलं आहे.

नीरज चोप्रासारखे युवक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 4-5 वर्षाचे कष्ट असल्याचं केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील जन आशीर्वाद यात्रेला संबोधित करताना ते बोलत होते.

नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळडूंचं कौतूक केलं. यावेळी त्यांनी वेटलिफ्टर मीराबाई चानूचं विशेष कौतुक केलं. तू पदक जिंकून देशाचं मोठं नाव लिहिलं पण तुझ्या एका कृतीनं मल खूप आनंद झाल. तू ड्रायव्हर्स लोकांचा केलेसा सत्कार. पदक मिळवल्यानंतर आठवणीने त्यांचा सत्कार करणं हे आपल्यावर असलेल्या संस्कारांचं दर्शन घडवून देत असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, देवूसिंह चौहान यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

मद्रास उच्च न्यायालयाने सीबीआयला म्हटलं पिंजऱ्यातील पोपट; केंद्र सरकारला दिले ‘हे’ आदेश

हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केल्याने स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल!

“नारायण राणेंसारखा बाडगा आणि बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”

‘आमच्या संघात खूप एकी, एकाला डिवचाल तर…’; के. एल. राहुलचा इंग्लंडच्या खेळाडूंना टोला

हातात बंदुका घेऊन इलेक्ट्रिक कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More