पुणे | राज्य सरकारने येत्या 30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे सरकारने परवानगी दिल्यामुळे ब्राह्मण महासंघाने यावर आक्षेप घेतला आहे.
एका महिन्यात परिस्थितीत असा काय फरक पडला की, सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांन केला आहे.
एल्गार परिषदेसाठी कोण वक्ते येणार?, या परिषदेचा उद्देश आणि निमित्त काय, हे कोणालाच माहिती नाही. किंबहुना या परिषदेला परवानगी देण्याची गरजही नव्हती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला पण मान्य आहे. मात्र त्या नावाखाली स्वैराचार होऊ नये एवढीच आमची इच्छा असल्याचं दवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एल्गार परिषदेच्या आयोजकांना योग्य समज आणि निर्बंधांची जाणीव करून देण्यात यावी. आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी.कोळसे पाटील यांनाही भेटून मागण्यांचं एक पत्र देणार असल्याची माहिती आनंद दवे यांनी दिली.
थोडक्यात बातम्या-
भाजपला धक्का! 11 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती धरलं धनुष्य
जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा!
लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल!
पुण्यात आगींचं सत्र सुरुच; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा डेपोला भीषण आग
माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही- अनिता बोस