बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! संपत्ती जप्त होण्याआधीच फरार परमबीर सिंह मुंबईत दाखल

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. हे आरोप केल्यानंतर काही दिवसांनीच परमबीर सिंह अज्ञातवासात गेले. माजी गृहमत्र्यांवर खळबळजनक आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांच्या विरोधातच अनेक आरोप झाले. अशातच आता परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहे.

पोलीस दलातीलच काही जणांनी परमबीर सिंह यांच्यावर खंडणी घेतल्याचे आरोप केले. पोलीसांना गुंगारा देत फरार झालेल्या परमबीर सिंह यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केलं. पण फरार घोषित झालेले परमबीर सिंह आज अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.

न्यायालयाने अनेक समन्स बजावूनही परमबीर सिंह न्यायालयासमोर हजर झाले नाहीत. न्यायालयाने त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस (Look Out Notice) जारी करूनही त्यांचा काही पत्ता नसल्याने न्यायालयाने अखेर परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं. त्यानंतर त्यांना न्यायालासमोर हजर राहण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळाला होता. त्यानंतर त्यांची संपत्ती देखील जप्त होणार होती.

परमबीर सिंह लवकरच चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 30 दिवसांच्या आत जर परमबीर सिंह समोर आले नाहीत तर त्यांच्या विरोधात संपत्ती जप्तीची कारवाई होणार होती. मात्र, जप्तीच्या कारवाईपूर्वीच परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More