बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठवणींना उजाळा! पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीनं शेअर केली पहिली पोस्ट

मुंबई | अभिनेत्री आणि अँकर मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. राज यांच्या अचानक निधनानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेकांनी राज कौशलच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. आता मंदिराने पती राजच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केली आहे.

राज गेल्यानंतर मंदिरानं इन्स्टाग्रामवर तिचा प्रोफाइल फोटो काढून काळ्या रंगाचा फोटो ठेवला होता. आता  इन्स्टाग्रामवर पती राजसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मंदिरा राजसोबत आनंदी दिसत आहे. पण आता राजच्या निधनानंतर त्याच्या आठवणीमध्ये मंदिराने हे फोटो शेअर केले आहेत.

पतीच्या निधनानंतरची तिची ही पहिली पोस्ट आहे. या पोस्टसोबत मंदिरानं काहीही लिहिलेलं नाही. शेअर केला तो केवळ एक इमोजी. आभाळाएवढं दु:ख तिनं फक्त या एका इमोजीतून व्यक्त केलं.

दरम्यान, अनेक कलाकारांनी फोटोवर प्रतिक्रिया देत मंदिराला धीर दिला आहे. साइन नेहवाल, हरभजन सिंग, अमृता सुभाष, अधुना, मिथिला पालकर, अरमान मलिक या सेलिब्रिटींनी काही क्षणातच मंदिराच्या पोस्टला रिप्लाय दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?”

“भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल”

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

हरभजन सिंग ‘या’ चित्रपटातून करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण!

एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा केली ‘इतकी’ वर्ष; एमपीएससीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More