बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा, नारायण मुर्तींसोबत आहे खास नातं

लंडन | द ग्रेट ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत सत्तेतून पायउतार झाले. त्यांनतर पंतप्रधानपदासाठी ब्रिटनचे माजी अर्थमंत्री व भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव चर्चेत आले आहे. ब्रिटनच्या संसदेने पुढील पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया नुकतीच सुरु केली आहे. या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक सर्वात आघाडीवर आहेत.

सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मुर्ती यांचे जावई आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समधील सत्तारुढ पक्षाचे नेते मार्क स्पेनर, पक्षाचे माजी अध्यक्ष ओलिव्ह डाऊडेन आणि कॅबिनेट मंत्री लियाम फॉक्ससह अनेक जेष्ठ खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिला आहे. बोरीस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमधील अराजकता वाढली होती. सत्तारुढ पक्षात गोंधळ निर्माण झाला होता. पक्ष विखुरला गेला होता.

त्यामुळे आता हे सर्व जागेवर आणण्यास सुनक यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे, असे सर्व नेत्यांचे मत आहे. तसेच देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. त्याला माजी अर्थमंत्री ऋषी सुनकच सांभाळू शकतात, असेही सर्वांचे एकमत झाले आहे. ब्रिटनचे संरक्षण मंत्री बॉलेस यांनी या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांची जागा निश्चितीकडे वाटचाल करत आहे.

ब्रिटीश प्रसारमाध्यामांच्या माहितीनुसार, या लढाईत एकूण सत्तारुढ पक्षाचे 16 नेते पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रत्येक उमेदवाराला 20 खासदारांच्या पाठींब्याची अट ठेवली जाऊ शकते. मंगळवार (दि. 12) पर्यंत हे अर्ज भरण्याची मुदत आहे. एक एक उमेदवार बाद होत शेवटी 21 जुलै रोजी शेवटचे दोन उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी त्यांना वेगवेगळ्या टप्प्यातील निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. साधारण 5 सप्टेंबरला ब्रिटनला नवीन पंतप्रधान मिळेल.

थोजक्यात बातम्या – 

“शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीसांनी दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असतील”

भाजप नेत्याचा मोठा दावा, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ

प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडला लाखांचा खजिना, वाचा सविस्तर

‘उद्धव ठाकरेंना भेटणार का?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपूरच्या विकासाबाबत केली महत्त्वाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More