बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना; बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही कोरोनाने मृत्यू

आंबेगाव | कोरोनाचा वाढता प्रभाव सध्या संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचं समोर येत आहे. अशात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी याठिकाणी बहिण-भावाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. माधवी बाळासाहेब हिंगे पाटील आणि मयूर बाळासाहेब हिंगे पाटील असं मृत पावलेल्या भावंडाची नावं आहेत.

15 दिवसांपूर्वी माधवी आणि मयूरसह त्यांच्या आई वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. काही दिवसांतचं आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली. पण दुसरीकडे माधवी आणि मयूरची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

उपचार सुरू असताना माधवीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. माधवीचा मृतदेह गावी नेवून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर दुसरीकडे मयूरचाही कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे हिंगे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

आयपीएलच्या पुनरागमनानंतर राजस्थान राॅयलने शेअर केला भन्नाट व्हिडीओ; पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट सापडला

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”

भाजपला धक्का! ‘इतक्या’ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन

‘मोदी सरकारला गुजराती कंपन्यांची काळजी’; मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More