बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बस कंडक्टर महिलेची निर्घृण हत्या; बुलडाण्यातील थरकाप उडवणारी घटना

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय बस कंडक्टर महीलेचा मृतदेह माळरानावर अत्यंत भयानक अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. माधुरी मोरे असं या महिलेचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या अंत्री खेडेकर येथील माधुरी मोरे या बुलडाणा राज्य परिवहन आगारात कंडक्टर म्हणून नोकरी करत होत्या. 14 एप्रिलला वडिलांना त्यांनी सांगितलं होतं की, त्या साखळी येथे आपल्या मावशीच्या घरी आहेत. त्यानंतर आपलं काम संपवून आठवडी सुट्टीला त्या अंत्री खेडेकरला येणार होत्या, पण आज अंत्री खेडेकरच्या माळरानावर त्यांचा मृतदेह आढळला.

माधुरी मोरे यांच्या मृतदेहाला चटके देण्यात आले होते. तसेच त्यांचा गळा चिरून मृतदेह माळरानात फेकून देण्यात आला होता. सकाळी फिरायला गेलेल्या लोकांना हा मृतदेह आढळल्याने त्यांनी लगेचच संबंधित घटनेची पोलिसांना माहिती दिली. माधुरी मोरे या घटस्फोटित असल्याचंही बोललं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील महिलेच्या अंगावर चटक्याचे वृन आहेत, तसेच गळा ही चिरण्यात आला असून हातापायावरही चाकूने वार केल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे, तसेच सदरील घटना ती प्राथमिकरित्या हत्या असल्याचं दिसून येत असल्याने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या -़

…अन् स्वप्नांचा क्षणातच चुराडा झाला; नववधूला घरी घेऊन जाताना नवरदेवाचा रस्त्यातच झाला मृत्यू

कोरोनाबाधित आईची एक चुक बेतली तिच्या चिमुकलीच्या जीवावर

देशात कोरोनाचा कहर; अदर पुनावालांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे केली ही विनंती

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल

‘कोरोना आपला पिछा सोडणार नाही, त्यामुळे…’; पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More