बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना’बाबत खबरदारी! बस कंडक्टरने प्रवाश्यांना वाटले मास्क

बंगळुरू | भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तर यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे.

नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे. यातच खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील हुबळी येथील एका बस कंडक्टरने प्रवाश्यांना मोफत मास्क वाटप केलं.

कर्नाटक राज्यातील बस कंडक्टर एम.एल. नदाफ आणि ड्राव्हर एच. टी. मयन्नावार यांनी मास्क विकत घेतले आणि यारगुप्पी ते हुबळीला जाणाऱ्या बसमधील प्रवाश्यांना प्रवाश्यांना मोफत मास्क वाटप केले.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे लोक प्रवास करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आम्ही मास्क वाटप करण्याचा पुढाकार घेतला. तसेच, लोकांना मोफत मास्क वाटप करावे, यासाठी मी सरकारला विनंती करतो, असं एम. एल नदाफ यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘चासकमान’साठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने; पवारांची पुनर्वसनमंत्र्यांशी चर्चा

#CoronaVirus : षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? 😂

महत्वाच्या बातम्या-

16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचं भवितव्य

राज्यात ‘कोरोना’चं थैमान; पाळीव प्राण्यांनाही ‘कोरोना’चा फटका

“सर्व बोर्डाच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More