बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साखर झोपेत असताना कोसळली इमारत; दुर्घटनेत 3 ठार तर 7 जखमी

मुंबई | गेल्या 72 तासात राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर राज्याच्या इतर भागांना पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच आता मुंबईतील गोवंडीमध्ये पावसामुळे घर पडल्याची दुर्घटना घडली आहे.

मुसळधार झालेल्या पावसामुळे मुंबईच्या गोवंडीभागात एक दुमजली इमारत पडली आहे. शिवाजीनगर जवळच्या बाॅम्बे सिटी रूग्णालयाजवळ ही घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींना किरकोळ दुखापत झाली आहेत. तर काहींना गंभीर इजा देखील झाल्या आहेत.

पहाटे इमारत कोसळल्याचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी धावाधाव केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पहाटे अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्कयू ऑपरेशनला सुरूवात केली. परंतू पावसामुळे रेस्कयू करताना अडचणी येत आहे. पहाटे घरातील सर्वजण साखर झोपेत असताना ही घटना घडली आहे.

दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकारमुळे कोकणात पूरस्थिती- प्रवीण दरेकर

भारताला मिळू शकते आणखी एक लस; ‘या’ लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

‘एमपीएससी’चा मोठा निर्णय!; ‘या’ उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आजही पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

“मदत का पोहोचली नाही?, सरकार काय करतंय? असे प्रश्न विचारायचे असतील तर…”

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात भूस्खलन; गावातील नागरिकांना हलवण्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More