बुलंदशहर हिंसाचाराचं दादरी कनेक्शन; मृत पोलीस अधिकारी होते साक्षीदार

लखनऊ | बुलंदशहर हिंसाचाराचा दादरी प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. जे पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली ते दादरी प्रकरणातील साक्षीदार होते. 

गोहत्येच्या संशयावरुन बुलंदशहरमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात सुबोध कुमार यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. 

सुबोध कुमार दादरी प्रकरणाचे तपास अधिकारी होते. दादरीत गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन अखलाख यांची जमावाने हत्या केली होती. याप्रकरणी सिंह यांनी अनेकांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. 

सुबोध कुमार मूळचे एटाचे रहिवासी होते. दादरी प्रकरणानंतर त्यांची बदली करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला घेरणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश

-सर जिओ नहीं चल रहा है; ग्राहकाची थेट मुकेश अंबानींकडेच तक्रार!

-महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ चा छापा

-DYSP भाग्यश्री नवटकेंना जेलमध्ये टाका, अन्यथा हायकोर्टात जाणार!

-आमदार अनिल गोटेंचा भाजपला आणखी एक मोठा धक्का