बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यातून थेट पहिल्या टप्प्यात गरुडभरारी; उद्या सर्वकाही उघडणार

बुलडाणा | महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेतील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे कोरोना आटोक्यात येत असल्याने विविध भागांमध्ये नागरिकांना लोकांमधून लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील अनलॉक पाच टप्प्यांमध्ये होणार असल्याचे राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच कोरोना परिस्थितीनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करून पाच स्तर बनवण्यात आले आहेत. त्यातच तिसऱ्या स्तरामध्ये असलेला बुलडाणा जिल्हा आता थेट पहिल्या स्तरामध्ये आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

बुलडाण्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सोमवारपासून बुलडाण्यातील संपूर्ण बाजारपेठ व व्यवहार सुरळीतपणे सुरू होणार आहेत. तसेच मॉल, सिनेमागृह व नाट्यगृह हे देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या जिल्हाभरात 367 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उद्यापासून संपूर्ण जिल्हा अनलॉक होणार असून नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत. पण, प्रशासनातर्फे नागरिकांना पूर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याचं समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या

 

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More