बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! बुलडाण्यातील रूग्णालयात एकाच कोरोना रुग्णाला दिले तब्बल 14 रेमडेसिविरचे डोस

बुलडाणा | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत असतानाच डेल्टा प्लस या नव्या विषाणूने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान बुलडाण्यातील एका खासगी रुग्णालयातून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील खामगाव मध्ये एका खासगी रुग्णालयाने एकाच रुग्णाला 14 रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस दिल्याचा प्रकार घडला आहे. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, या रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या परवानगीविना कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.

लाईफलाईन रुग्णालय बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले आहे व पोलिसांनी देखील या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. बुलडाण्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. खासगी रुग्णालयात सुरू असलेला हा बाजार प्रशासनातर्फे उधळून लावणे गरजेचं असल्याचं बोललं जातं आहे.

सुरुवातीला लाईफ लाईन या रुग्णालयात अनधिकृतरित्या कोरूना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यानंतर या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदारांनी जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांना समिती नेमून तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चौकशी सुरू असताना एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

 

थोडक्यात बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More