बुलडाणा | बुलडाण्यात सासू सासऱ्यांनी सूनेचं कन्यादान केलं आहे. आपल्या सुनेचं कन्यादान करून त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या ठिकाणी ही घटना घडली.
सुनगाव येथील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाचा धामणगाव तालुका संग्रामपुर येथील राधा उमाळे यांच्यासोबत 16 मार्च 2020 रोजी विवाह झाला होता. मात्र दुर्देवाने 31 ऑगस्ट 2020 ला संतोषचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर राधा ही आपल्या सासू सासऱ्यांकडे राहत होती. तिचे सासरे शालिग्राम वानखडे आणि सासू वत्सलाबाई यांनी राधाचा स्वत:च्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. राधा सात ते आठ महिने सासरी राहत होती. काल राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्न राजनकार यांच्याशी करण्यात आला आहे.
दरम्यान, हा विवाह नोंदणी पद्धतीने आयोजित केला होता. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह पार पडला. हा विवाह सोहळा सुनगाव येथे पार पडला.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला राज ठाकरेंची चिंता; पत्राद्वारे केली मास्क घालण्याची विनंती
ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ
बारामतीच्या ‘त्या’ रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर!
‘कृषी कायदे मागे घेऊन सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी’; दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
पोलीस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळुन पत्नीनंतर पतीनेही केली आत्महत्या!
Comments are closed.