देश

नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

वाराणसी | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यासमोर दोन बैलांची झुंज झाल्याचा प्रकार समोर आलाय. पंतप्रधान वाराणसीच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा केंट रेल्वे स्टेशनकडे जात होता. त्यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर दोन बैल झुंज करत असल्याचं दिसलं. या प्रकारामुळे मोदींच्या गाड्यांचा ताफा थांबला. 

दरम्यान, पोलिसांनी पुढे होत या बैलांना हटवलं. त्यानंतर मोदींच्या गाड्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. मात्र मोदींच्या मार्गात अशाप्रकारे सुरक्षाव्यवस्थेचा गलथानपणा कसा घडला, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी असतं; सदाभाऊ खोतांकडून आंदोलकांची खिल्ली

-भोर नगरपालिकेत ‘शत प्रतिशत काँग्रेस’; विरोधकांना एकही जागा नाही!

-राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची कबुली

-…आपण मात्र हिंदू-मुस्लीम खेळ खेळत बसलोय; हरभजनचं विचार करायला लावणारं ट्विट

-नितीन गडकरींच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून राडा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या