बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती

मुंबई | बाॅलिवूडमध्ये बिग बी या नावाने संपुर्ण देशात प्रसिद्ध असणारे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तरुणपणापासून लोकांच्या मनावर अभिराज्य गाजवत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही अमिताभ यांनी सोशल मीडियाचा आधार घेत मनोरंजनाचं कार्य अविरत सुरू ठेवलं. ते अनेकदा आपल्या सोशल मीडियावरुन त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कामाचे आणि त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणांची माहिती देत असतात. एवढचं नाहीतर सोशल मीडियवर फोटो शेअर करताना त्या फोटोला कॅप्शन म्हणून त्यांच्या चाहत्यांसाठी कविता देखील बनवून टाकत असतात.

ट्विटर, इंस्टाग्राम अशा काही सोशल अॅप्सवर अमिताभ यांचं अकाऊंट असून tumblr.com या वेबसाईटवर देखील त्यांचं ऑफिशिअल अकाऊंट आहे. तिथं ते  गेले 4747 दिवसांपासून रोज ब्लाॅग शेअर करतात. यादरम्यान त्यांच्या नुकत्याच शेअर केलेल्या ब्लाॅग मध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मेडिकल कंडिशन, शस्त्रक्रिया चालू आहे, जास्त लिहू नाही शकत, अशा शब्दात त्यांनी एक ब्लाॅग शेअर केला आहे. या कारणामुळे त्यांचे चाहते चिंतेत आले असून अनेक जनांनी कमेंट्समध्ये त्यांना स्ट्रेस न घेता काळजी घेण्यास सांगितलं आहे. तसेच त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ ह्या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात बच्चन क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकरणार आहेत. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होण्याची महिती स्वतः बच्चन यांनी दिली होती. एवढचं नाही तर या चित्रपटाचं पोस्टर देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार?; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन नंतर दगडाने ठेचलं; पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ

“नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत”

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More