महाराष्ट्रात लोकसभेचं काय चित्र असेल?? वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेने काय सांगितलंय

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपला आहे. 7 टप्प्यांमध्ये झालेला लोकशाहीचा हा उत्सव संपला असून आता फक्त 23 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. पण त्या अगोदर या निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो याचा अंदाज देणारे एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत.

शिवसेना भाजप युतीला 34 जागा मिळू शकतात, असा अंदाज TV9-सी व्होटर सर्व्हेने व्यक्त केला आहे.

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 14 जागा मिळू शकतात, अशी शक्यता या सर्व्हेने व्यक्त केली आहे.

काँग्रेसला 8 जागा तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळू शकतात. गेल्यावेळी पेक्षा राष्ट्रवादीच्या 2 जागा तर काँग्रेसच्या 6 जागा वाढू शकतात, असा अंदाज हा सर्व्हे व्यक्त करतोय.

महत्वाच्या बातम्या

-अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…; मुस्लिम युवकाने केला जेजुरीच्या खंडोबाला नवस

-हिमालयात काहीतरी विशेष आहे; नरेंद्र मोदींनी पोस्ट केले आणखी काही फोटो

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नव्या चेहऱ्याला मिळणार संधी?

-नवज्योत सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे- पंजाबचे मुख्यमंत्री

-“रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं”