Top News

शिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ??

मुंबई |  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन शिवसेनेत नाराजीची पहिली ठिणगी पडली आहे. औरंगाबादमधील शिवसेना आमदार शपथविधीकडे पाठ फिरवणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. भाजपकडून 4 ते 5 आमदार तर शिवसेनेकडून 2 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती कळतीये.

मराठवाड्यात शिवसेनेच्या एकही आमदाराला मंत्रिपद नसल्याने शिवसेना आमदार नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील सेना आमदार शपथविधीला जाणार नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

-प्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत

-मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का??; उदयनराजे चिडले

-वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील

-बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या