बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

 मुबंई | 165 आमदारांचा पाठिंबा मिळाला असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही? घोडं कुठ पेंड खातंय?, असा सवाल राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला होता.

अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

25 जुलैपासून राज्यात पावसाळी अधिवेशन (Monsoon session)  सुरू होणार आहे. त्यामुळे 20 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार असेल. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील पाच ते सहा मंत्र्यांना तर भाजपच्या सहा ते सात मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विरोधकांची टीका सुरू आहे. अनेक कामं रखडली आहेत. असा सवाल विचारला असता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले. विरोधकांची लाईन डेड त्यामुळे त्यांना डेडलाईन (deadline) हवी आहे. काळजी करू नका मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल, अस ते म्हणाले. आता होणाऱ्या या मंत्रीमंडविस्तारात कोणतं पद कोणाला मिळणार याकडं सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या

“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न”

सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल

“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

“दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More