Top News

पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार- राजेश टोपे

मुंबई | कोरोनाकाळात सेवा देताना मृत्यू झाल्यास संबधिताच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांचं विमा कवच दिलं जात आहे. आता पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याने, पत्रकारांना देखील 50 लाख रुपयांचं विमा कवच देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्य सरकार पत्रकारांच्या बाजूने कायम आहे. 50 लाखाच्या विमा कवचाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा झाली आहे. ते निर्णयाच्या बाजूने आहेत, राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

पत्रकार हे प्रत्येक ठिकाणी वार्तांकन करण्यास जातात. अशा परिस्थितीत त्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये, असं राजेश टोपे म्हणालेत.

दरम्यान, येत्या काळात अधिकाधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहोत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत आत्महत्याप्रकरणी नोकर दिपेश सावंतला अटक

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच; पाहा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने आव्हानात्मक आहेत- उद्धव ठाकरे

“सुशांत माझा मित्र नव्हता नाही मी त्याला ओळखत होता, पण सतत त्याच्या विचाराने मला झोप लागत नाहीये”

“राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना काँग्रेस अध्यक्ष बनवा”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या