बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा”; ‘या’ माजी विधानसभा अध्यक्षांची मागणी

औरंगाबाद | गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा अवैध ठरवला तसेच मराठा आरक्षण रद्द केलं. या सर्व प्रकरणात महाराष्ट्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे. सरकारने आपली बाजू व्यवस्थितरित्या न्यायालयासमोर मांडली नसल्याने हा निकाल लागला असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याचं बोलून दाखवलं. तसेच जसं 370 कलम रद्द केलं तसंच मराठ्यांना आरक्षण केंद्राने मिळवून द्यावं, असं देखील बोलून दाखवलं. या प्रकरणात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचं 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा,  अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रात मागासवर्ग आयोग नेमने, आयोगाचा अहवाल स्वीकारणे आणि तो केंद्राकडे पाठवणे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. तसेच सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यात व्यस्त असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच मराठा समाजाचं आरक्षण मजबूत करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची मागणी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

सोनिया गांधींनी पुन्हा एकदा दाखवला ‘या’ नेत्यावर विश्वास सोपवली महत्वाची जबाबदारी 

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास MPSC ची तयारी

सोशल मीडियावर मुलगा बनून तरुणीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, सेक्स टाॅयने ठेवले शारीरिक संबंध

आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आजीने उघडले डोळे अन्…

कोरोनानंतर होणारा ‘म्युकरमायकोसिस’ आजार नेमका आहे तरी काय? वाचा संपुर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More