बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज महाराष्ट्र बंदची हाक! कोणत्या सेवांवर होणार परिणाम?, वाचा सविस्तर

मुंबई | लखीमपूर खीरी येथे निष्पाप शेतकऱ्यांना चिरडून मारल्याप्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी सरकारने दिली आहे. काल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेेनेच्या नेत्यांनी या बंदमध्ये सक्रीय सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र बंदला सुरूवात झाली असून आज सकाळपासूनच पु्ण्यातील रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तरी या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे त्या सेवा सुरू असणार आहेत. अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पाठींबा दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती पुर्णपणे बंद राहणार आहे, तसेच शेतकऱ्यांनीही बाजारात माल आणु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा, ऑटो, कॅब यांच्यावरही या बंदचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दळणवळणाच्या साधनावर मोठ्या प्रमाणात या बंदचा परिणाम दिसून येऊ शकतो. भाजपने या प्रकरणात राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

आजच्या महाराष्ट्र बंदला काही व्यापाऱ्यांनी जरी पाठींबा दिला असला तरी काहींनी मात्र त्याची निंदा करत दुकानं सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याच बरोबर आता आज दुकानं उघडणार का? की या बंदला सरसकट पाठिंबा मिळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; नवाब मलिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

“केवळ आश्वासनाचे डोंगर उभा करून ठेवलेत, मदत म्हणून फुटकी कवडी सुद्धा दिली नाही”

‘आधुनिक महिलांना नको असतं मुल’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळं

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More