बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोदींजीना बोलवा, तरच मी लस घेईल’; पठ्ठ्याच्या मागणीनं अधिकाऱ्यांना फुटला घाम

भोपाल | गेल्या 2 वर्षात कोरोनाने जगभर थैमान घातलं होतं. त्यानंतर आता कोरोनावर एकमेव उपाय असलेल्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत देशभरात अनेकांनी लसीकरण पुर्ण केलं आहे. पण मध्य प्रदेशच्या एका युवकाने केलेल्या मागणीमुळे अधिकाऱ्यांना देखील घाम फुटला आहे.

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात दाही ब्लाॅकमध्ये लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाची एक टीम पोहचली होती. त्यावेळी सर्वांचं लसीकरण करण्यात आलं, मात्र, एका तरूणाने लस घेण्यास नकार दिला. आरोग्य अधिकाऱ्यांनी तरूणाला विनंती केली त्याने लस घ्यावी. परंतू त्याने लस घेण्यास साफ नकार दिला.

अखेर वैतागून अधिकाऱ्यांनी तरूणाला विचारलं कोणाला बोलवू म्हणजे तू लस घेशील? त्यावेळी त्याने सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवा, तरच मी लस घेईल, नाहीतर मी लस घेणार नाही. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील तो मोदींना बोलवून आणा, या त्याच्या मागणीवर तो ठाम राहिला.

दरम्यान, मी केवळ नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत लस घेईल, असंही तरूणाने सांगितलं आहे. या तरूणाने अद्याप कोरोनाचा पहिला डोस देखील घेतला नाही. आम्ही या तरूणाला समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदीजी म्हणतील, मैं संजय राऊत के सामने रहता हूँ”

”उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

मी स्वतःला भाग्यवान समजतो…, शिक्षण क्षेत्रात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे काम उल्लेखनीय – चंद्रकांत पाटील

“कोल्हापूरचा गडी कोथरूडला आलाय, पण आमच्या अंगावर येऊ नका”

मोठी दुर्घटना! नदीत बोट उलटल्यानं 22 जण बुडाले

“अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More