बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला मिळू शकते आणखी एक लस; ‘या’ लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली | देशात अद्यापही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे सध्या कोरोनापासून वाचण्यासाठीचं एकमेव शस्त्र म्हणजे लसीकरण. अशातच आज शुक्रवारी अहमदाबादची औषध कंपनी ‘झायडस कॅडिला’ कोरोना लसीचा डाटा ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे सोपवण्यात येणार आहे. अशातच ‘झायडस कॅडिला’ लसीला लवकरच आपात्कालीन वापराची मंजुरी दिली जाऊ शकते, अशी आशा डॉ. अरोरा यांनी व्यक्त केलीय.

‘झायडस कॅडिला’ लसीला परवानगी मिळाल्यास ही लस जगातील पहिली डीएनए आधारित लस असणार आहे. ही लस डीएनए आधारित असल्यानं त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ‘झायडस कॅडिला’ नं म्हटलं होतं, की मंजुरी मिळाल्यानंतर दोन महिन्यांतच लस लॉन्च करू शकतात. फार्मास्युटिकल फर्मनं 1 जुलै रोजी तीन डोसच्या डीएनए लसीसाठी आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी अर्ज केला होता.

या लशीला मंजुरी मिळाल्यास ही भारतातील दुसरी स्वदेशी लस असेल आणि देशात वापरासाठी परवानगी मिळालेली पाचवी लस ठरेल. ‘झायडस कॅडिला’ लस 25 डिग्री सेल्सिअसवर तीन महिन्यांपर्यंत स्टोर करून ठेवता येते.

दरम्यान, झायडस कॅडिलाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली असून ती आता मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. चाचणीत लस यशस्वी ठरली तर ती लहान मुलांसाठी वापरता येऊ शकते, असं डॉ. अरोरा यांनी ‘एनडीटीव्ही’ न्यूज चॅनलशी बोलताना म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

“मदत का पोहोचली नाही?, सरकार काय करतंय? असे प्रश्न विचारायचे असतील तर…”

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात भूस्खलन; गावातील नागरिकांना हलवण्याचे आदेश

सगळं शहर पाण्यात, भूकेनं लेकरं व्याकूळ, दूध घेऊन ‘देवरुपी माणसं’ धावली

‘संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत’; प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन भरपावसात माणगावमध्ये दाखल

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने घेतला मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More