बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; ‘या’ आमदाराला संधी

मुंबई | विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी ( Assembly Speaker ) निवडणूक होणार आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत फार्म भरण्याची मुदत होती. अखेरच्या राहिलेल्या अर्ध्या तासात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

मविआ मधून विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी (Rajan Salvi) यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. राजन साळवी आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. 2009 पासून सलग तीनवेळा राजापूर मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. शिंदेच्या बंडानंतर राजन साळवी यांची उपगटनेतेपदी निवड करण्यात आली होती.

भाजपकडून राहूल नार्वेकर (rahul navekar) यांचं नाव जाहिर करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजण साळवी विरूद्ध राहूल नार्वेकर अशी लढत असेल. ही लढत चुरशीची असणारा आहे. राहूल नार्वेकर यांच्याकडे 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. असं असतानाही या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. आता या निवडणुकीत पुन्हा काय राजकीय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड

बंडखोर आमदार राहिलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?; आकडा वाचून धक्का बसेल

ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर

“शासकीय पूजेनंतर महिन्याभरात शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार”

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More