बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी अजूनही काँग्रेससोबतच, सध्या तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही”

चंदीगड | कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. एवढंच नाही तर नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणखीन 4 नेत्यांनी देखील राजीनामा दिला आहे. अशातच आता अमरिंदर सिंग यांच्या पत्नीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. यादरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मी काँग्रेसची खासदार असून मी या पदावर कायम राहणार असल्याचं देखील परनीत कौर म्हणाल्या आहेत.

मी अजूनही काँग्रेस पक्षासोबतच राहणार आहे. मी काँग्रेसची खासदार असून त्या पदावर देखील मी कायम राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही, असं परनीत कौर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आपल्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी भविष्यातील निर्णायाचा उल्लेख केलेला नाही. यावेळी मी भविष्यातील योजनबद्दल काही बोलणार नाही, मात्र पंजाब काँग्रेसमध्ये जे चाललंय त्याने प्रत्येक कार्यकर्ता दुःखी असल्याचं परनी कौर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका! पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता

“देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला ‘तो’ अध्यादेश लागू करावा”

“आता ते जिथूनही निवडणूक लढतील, मी त्यांना जिंकू देणार नाही”

पंजाब किंग्जला मोठा धक्का! ‘युनिव्हर्सल बाॅस’ आयपीएलमधून बाहेर

दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये, मात्र… – उदय सामंत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More