मोदीजी… पोकळ दिलासा नको, बदला घ्या बदला!

गुरुग्राम | मोदीजी… आता फक्त दिलासा नको, तर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तान्यांचा बदला घ्या, अशी मागणी शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी केली आहे. पंतप्रधान मोदींकडे ही मागणी करताना त्यांना रडू कोसळलं.

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कॅप्टन कुंडू यांच्यासह भारताचे 4 जवान शहीद झालेत. जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि पूँछ भागात पाकिस्तानने मिसाईल डागली आहेत. 

दरम्यान, माझा नातू देशाच्या कामी आला याचा आम्हाला अभिमान आहे. तो आमचा एकुलता एक नातू होता, आता आम्ही तर सर्व गमावून बसलोय, असंही ते यावेळी म्हणाले.