बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्लासी राहुलच्या वादळी खेळीने पंजाबच्या आशा पुन्हा जिवंत; तब्बल ‘इतक्या’ षटकारांची केली आतषबाजी!

मुंबई | आयपीएलमधील आज 53 वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघामध्ये खेळवला गेला. चेन्नई संघातील फाफ डुप्लेसिस या फलंदाजाने एकहाती किल्ला लढवत 76 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्यामुळे चेन्नई संघाने पंजाबसमोर 134 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर कर्णधार के.एल राहुलच्या धडाकेबाज खेळीमुळे पंजाबने हा सामना 6 गडी राखुन आपल्या खिशात घातला.

पंजाब संघाच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत चेन्नईच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. अर्शदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी 2 बळी टिपले. फाफ डुप्लेसिस वगळता चेन्नईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे चेन्नईला फक्त 134 धावसंख्या उभारता आली.

के.एल राहुलने या सामन्यात 8 गगनचुंबी षटकार आणि 6 खणखणीत चौकार ठोकत 42 चेंडूत 98 धावांची विजयी खेळी साकारली. आयपीएलच्या या हंगामातील सर्वात जास्त षटकार राहुलच्या नावावर आहेत. तर 626 धावा करत ऑरेंज कॅप सध्या राहूलच्याच नावावर आहे.

दरम्यान, आयपीएलच्या 14 व्या हंगामातील सध्या शेवटचे सामने होत आहेत. 15 ऑक्टोबरला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स ,चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने दिमाखात बादफेरीत प्रवेश केला आहे.

थो़डक्यात बातम्या-

“उद्धवजींची बोली अन् बंदुकीची गोळी एकसारखीच, त्यांचा आदेश आला की…”

“पवार घराण्याला महाराष्ट्र लुटायचा काय ठेका दिलाय का?”

…म्हणून रवी शास्त्रींपाठोपाठ ‘हा’ दिग्गजही संघाला जातोय सोडून, वाचा कारण!

“कालच्या निकालाचा आणि आजच्या छाप्याचा काही संबंध आहे का?”

गुंतवणूकदार मालामाल! अवघ्या काही मिनिटांत ‘हे’ दोन शेअर्स उसळले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More