बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी केला आहे.

माझ्या डीसीपीडीएल कंपनीत 52 टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी, सीआययू युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरुन माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केला आहे.

परमबीरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असून सीआययू युनिटच्या अंतर्गत तपास येत असलेल्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी छाबरिया यांनी केली आहे.

दरम्यान, दिलीप छाब्रिया हे कार डिझायनर आहेत. सेलिब्रिटी आणि धनाढ्यांच्या कार डिझाईन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅनही दिलीप छाब्रियांनीच डिझाईन केली होती. क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने दिलीप छाब्रियांविरोधात 2015 मध्ये तक्रार नोंदवली होती. दिलीप छाब्रियांनी पाच लाख रुपये घेऊनही आपले काम योग्य पद्धतीने न केल्याचा आरोप दिनेश कार्तिकने केला होता. चार महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर छाबरिया सध्या जामिनावर बाहेर आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

एका मृत्यूचा मुद्दा बनवला जातोय, लसीचे दोन डोस घेऊन मेलेल्या अनेक डॉक्टरांचं काय?- बाबा रामदेव

‘तुमचा मनसैनिक खचलाय, आता याला तुम्हीच उत्तर द्या’; मनसे पदाधिकाऱ्याची राज ठाकरेंकडे मागणी

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

“70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात विकायला काढलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More