बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मिरवणूक काढल्याने माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

हिंगोली | वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण नुकतंच करण्यात आलं. यावेळी डिजे व फुलांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली होती. आता या मिरवणूकीप्रकरणी माजी सहकार कॅबिनेट मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यासह उपस्थित 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोलीमधील वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी डिजे, ढोल पथक यांसह मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीमुळे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन झालं असल्याने मुंदडा यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन मुंदडा यांनी केलं असल्याने त्यांच्यासह उपस्थित अनेक राजकीय व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोलीतील शिवसैनिकांनी मात्र याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेने सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढून पुष्पहार अर्पण केला होता. सर्वच क्षेत्रातून याप्रकरणी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर नवघरे यांनी समाजमाध्यमांसमोर याप्रकरणी माफी मागितल्याने प्रकरण शांत झाले होते. त्या घटनेनंतर आता मुंदडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी लाखोंची रक्कम

“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

आता गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वाचवा पैसे, कसं ते वाचा सविस्तर

“…पण जेव्हा सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही”

पुण्यात डिझेलची शंभरी पार तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More