Top News

‘ही’ नावं संपुष्टात येणार; ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात असंख्य लोकवस्त्या आहेत. या वस्त्यांना जातींवरून नावं देण्यात आलेली आहेत. मात्र, आता अशा वस्त्यांना असलेली जातींची नावं हद्दपार होणार आहेत.

काळानुसार काही निर्णय घेण्याची गरज असते. यापुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचं मुंडेंनी सांगितलं होतं.

राज्यात अनेक शहरात कुंभार वाडा, तेली पूरा, बारी पुरा, चांभार वाडा, ब्राह्मण आळी, सुतार गल्ली, सोनार वाडा, गवळी चाळ आदी नावं वस्त्यांना देण्यात आली आहेत. मात्र आता जातीवाचक वस्त्यांची नावं हद्दपार करून त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सर्वसामान्य नागरिकांआधी नेत्यांना कोरोना लस द्या; शिवसेना नेत्याची मागणी

…तर अमित शहांची देखील काॅलर धरु; राजू शेट्टींचा इशारा

“भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत”

“…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू”

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या