बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ATM सेंटरमधलं CCTV फुटेज व्हायरल, ‘या’ माणसाचा कारनामा पाहून सारेच हैराण

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एटीएममधून चक्क सॅनिटायझरची बाटली चोरून नेताना दिसत आहे. केरळमधील कोझिकोडेमध्ये ही घटना घडली आहे.

एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातो. एटीएममधून पैसे काढल्यानंतर ही व्यक्ती चक्क हात सॅनिटाइझ करण्यासाठी ठेवलेली सॅनिटायझरची बाटली चोरून नेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्यक्तीने एटीएममधून पैसे काढले. त्यानंतर सॅनिटायझरच्या बाटलीकडे आणि सीसीटीव्हीकडे पाहिलं. त्यानंतर त्याने ही सॅनिटायझरची बाटली उचलून बॅगेत टाकली आणि निघून गेला.

आपीएस अधिकारी दीपांशू काब्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशामध्या लाखो एटीएम आहेत. अशा मूर्खांपासून एटीएममधील सॅनिटायझर वाचवण्यासाठी प्रत्येक एटीएममध्ये 200 ते 300 रुपयांचा पिंजरा लावावा लागला तर शेकडो कोटी रुपये खर्च होतील, असं दीपांशू काब्रा म्हणाले.

दरम्यान, तुमच्या मर्यादित आचरणामुळे हे पैसे वाचले असते. तसेच तुमच्याच भल्यासाठी खर्च झाले असते. असो, आम्ही सुधरणार नाही, असं ट्विट आपीएस अधिकारी दीपांशू काब्रा यांनी केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्याकडून पैसे घेते आणि दुसऱ्यांशी बोलते’; संतापलेल्या प्रियकराने केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पेटारा उघडला, केली मोठी मदत

‘बाळांनो, आम्ही लगेच येतो’ सांगून कोरोना उपचारासाठी गेलेल्या दाम्पत्याला कोरोनाने गाठलं

कडक सॅल्यूट! पत्नीचे दागिने विकून पठ्ठ्याने रिक्षाला बनवलं रुग्णवाहिका

शिक्षक असलेल्या पतीने पत्नीचा आणि 13 महिन्यांच्या मुलाचा गळा चिरुन केला खून; कारण अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More