मनोरंजन

“…तर सुशांतने भारतासाठी ऑस्कर जिंकला असता”

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतने गळफास लावून आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री सेलिना जेटली हिने सुशांतच्या नैराश्यावर भाष्य करत त्याच्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली.

नैराश्य ही अत्यंत वाईट स्थिती असते. व्यक्ती कितीही श्रीमंत असो किंवा गरीब तो नैराश्यामुळे भरडला जातो. त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. अनेकदा तो चूकीचे निर्णय घेतो. हा अनुभव मी देखील घेतला आहे, असं सेलिनाने सांगितलंय.

सुशांतची देखील अशीच अवस्था झाली असेल. म्हणूनच त्याने असं टोकाचं पाऊल उचललं. अन्यथा अभिनयात इतका तरबेज असलेला एक यशस्वी अभिनेता आत्महत्येचा विचार का करेल? त्याचा अभिनय पाहून मला वाटायचं सुशांत एक दिवस सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव नक्की कोरेल, असं सेलिना म्हणाली आहे.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

“मुंबईतील कोरोनाच्या दयनीय अवस्थेला मुख्यमंत्रीच जबाबदार”

भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या