बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जीवाची पर्वा न करता सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविकेचा कोरोनाने मृत्यू, केंद्राकडून 50 लाखांची मदत

पुणे | कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून डॉक्टर, पोलीस, नर्स आणि आशा सेविका आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. यातील कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच केंद्राने कोरोनाच्या पहिल्या लाटेत हिंजवडीतील माण येथील आशा सेविका मंगल बलकवडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. केंद्राने मंगल बलकवडे यांच्या बलिदानाची दखल घेत कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेंअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील अशा प्रकारची मदत मिळालेेले बलकवडे पहिलंच कुटंब आहे.आयटीनगरी माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून मंगल बनसोडे कार्यरत होत्या. त्या माण येथील बोडकेवाडी येथे वास्तव्यास होत्या.

मंगल बलकवडेंच्या निधनानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असलेल्या नियोजित विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मिळावी यासाठी माण ग्रामपंचायतची आग्रही होती. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने, पंचायत समिती मुळशीच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला यश आलं असून बलकवडे यांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळाली असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य माण बोडकेवाडी येथे मंगल बलकवडे या 2008 पासून आशासेविका या पदावर मानधनावर कार्यरत होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, सुशील आणि प्रामाणिक होता. मात्र कोरोनाने त्यांच्या बळी घेतला.

थोडक्यात बातम्या- 

चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर! आजी-आजोबा, मग बाबा त्यानंतर तरूण मुलाचा कोरोनाने मृत्यू

महाराष्ट्रभर गोंधळ उडवून मंत्री विजय वडेट्टीवार नागपुरात!

कॅन्सर पीडित किरण खेर यांचा पहिला व्हिडीओ आला समोर, म्हणाल्या….

…अन् अचानक पानघोड्याने पाण्यात सुरू केला बोटीचा थरारक पाठलाग; पाहा व्हिडीओ

“ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा”; महाराष्ट्र सरकार टीकेच्या केंद्रस्थानी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More