मुंबई | मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असं केंद्राने या पत्रात नमूद केलं आहे.
MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा, असंही केंद्राने या पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान, आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. तसेच केंद्राच्या या पत्रानंतर राज्य सरकार यावर काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुकेश अंबानींना मोठा धक्का; फोर्ब्स बिलेनियर्सच्या यादीत अंबानींची 9 व्या स्थानी घसरण
कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
पंजाब पाठोपाठ राजस्थानमध्ये देखील मोदी सरकारला झटका!
महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?; मनसेचा सवाल
“मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका”