बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्राच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा

नवी दिल्ली |  केंद्र सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला खर्चाच्या दीडपड हमीभाव देण्याचं आपलं वचन पूर्ण केलं आहे, असं केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. 2020-21 मधील खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या 14 पिकांसाठी सरकारने हमीभाव जाहीर केला आहे. या 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना जवळपास 50-80 टक्के अधिक किंमत मिळेल, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांसह मजुर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या घटकांसाठी केंद्र सरकारनं काही घोषणा केल्या आहेत. मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली.

हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनाही केंद्र सरकार मदत करणार आहे. यात सलून आणि इतर व्यवसायिकांचा देखील समावेश केला जाईल, असा मोठा निर्णय कॅबीनेट बैठकीत झाल्याचं जावडेकरांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर दोनच दिवसात 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा देण्यात आली. 20 कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत पोहचवण्यात आली. पीएम किसान योजनेंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरुपात मदत देण्यात आली, असा मदतीचा पाढा त्यांनी पत्रकार परिषदेत वाचला.

ट्रेंडिंग बातम्या-

‘जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले त्यांनी…’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

…अन् मीच पास झालो अशी मला फिलिंग आली, राज्यमंत्री तनपुरेंचं विद्यार्थ्यांना खास पत्र

महत्वाच्या बातम्या-

पृथ्वीबाबांचा मोदी अन् ठाकरे सरकारला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

जिवलग मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानचं भावनिक ट्विट

ठाकरे सरकारची ‘मराठी ललकार’… सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More