बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लखीमपूरचे आंदोलन दडपवण्यासाठीच केंद्र सरकारने जाणीवपूर्वक फेसबुक, इन्स्टाग्राम बंद केलं”

नवी दिल्ली | सोमवारी रात्री काही तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तासांसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपची सेवा संपूर्ण जगभरात ठप्प झाली होती. अचानक खंडित झालेल्या या सेवेमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आजदेखील या बाबतचे अनेक जोक्स आणि मीम्स समाजमाध्यमांवर प्रसारित होताना दिसत आहेत.

सोमवारी घडलेल्या सर्व प्रकारास राजकीय वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी याबाबत मोदी सरकारला दोष दिला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे आंदोलन दडपण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपची सेवा खंडीत करण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी केला आहे.

याबरोबरच आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतं, असं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेत्या पंखुरी पाठक यांनी देखील याआधी एवढा वेळ कधी इन्स्टाग्राम, फेसबुक बंद होते का? हे डाउन झाले की लखीमपूर हिंसाचाराचे सत्य दडपण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आले? अशा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला आहे.

दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप एवढा वेळ बंद असणे योगायोग आहे की प्रयोग? अशी शंका काँग्रेस सोशल मिडीया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी उपस्थित केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘माझ्या वडिलांना…’; एनसीबीकडे शाहरूख खानबाबत आर्यनने केलं मोठं वक्तव्य!

तालिबान्यांच्या ‘या’ नव्या फतव्यामुळे अफगाणिस्तानमधील तरूण मोठ्या संकटात!

महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्याच्या नातीला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता करतोय डेट???

केंद्राने गरिबांच्या खात्यावर 1 लाख कोटी पाठवले- नरेंद्र मोदी

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More